चासमध्ये वादळी वाऱ्याने कोसळली झाडे

चासमध्ये वादळी वाऱ्याने कोसळली झाडे

Published on

महाळुंगे पडवळ, ता. ८ : चास (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वारे आणि तुरळक पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून दोन ठिकाणी महावितरण कंपनीचे विजेचे खांब कोसळले आहेत. तर आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
चास येथे बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अर्धातास वादळी वारे सुरु होते. तसेच तुरळक प्रमाणात पाऊसही झाला. विद्युत प्रवाह सुरु असताना वादळी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा आणि खांब तुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष बन्सी शेगर यांनी वायरमन अशोक भोर यांना माहिती दिली. तत्काळ वीज प्रवाह बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेगरमळा, गणेशवाडी, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंबा, सुबाभूळ, कडुनिंब आदी झाडे पडली आहेत. काढणीला आलेले आंबे जमिनीवर पडले होते. सुमारे ३० ते ४० टक्के आंब्यांचे नुकसान झाले आहे. शेताच्या बांधावर साठवणूक केलेल्या कांद्यांवर शेतकऱ्यांनी ताडपत्री टाकली होती. परंतु वादळी वाऱ्याने ही ताडपत्री उडून गेली. त्यामुळे काही ठिकाणी कांदेही भिजले आहेत.
वादळी वाऱ्याचा फटका महावितरण कंपनीला बसला. विजेच्या खांबावर झाडे पडल्याने तारा तुटल्या असून खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण चास गावासह जांभळेमळा, भोरवाडी, शेगरमळा आणि अन्य वस्तीवरील घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. जनमित्र अशोक भोर यांनी जांभळेमळा परिसर वगळता चास गावातील विद्युत पुरवठा रात्री साडे आठ वाजेपर्यंत सुरळीत सुरु केला. घोडेगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजू भोपळे यांनी केलेल्या सूचनेनुसार शाखा अभियंता सागर झेंडे, लाइनमन राजेंद्र कोकणे, वायरमन अशोक भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ विजेच्या तारा जोडून खांब उभे करण्याचे काम सुरु केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com