शर्यती गाजविणारा ‘चिम्या’ बैलाचा मृत्यू

शर्यती गाजविणारा ‘चिम्या’ बैलाचा मृत्यू
Published on

महाळुंगे पडवळ, ता.१२ : उत्तर पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीच्या घाटात नावलौकिक मिळविलेल्या साकोरे (ता.आंबेगाव) ‘चिम्या’ बैलाचा बुधवारी (ता.११) मृत्यू झाला. त्याने हिंदकेसरी, गोकुळाष्टमी चषक, बैलगाडा भूषण, भूमिपुत्र असे मानाचे पुरस्कार मिळविले होते.
साकोरे येथील सरपंच अनिल गाडे व बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष गणेश गाडे यांनी चिम्या हे वासरू दोन वर्षांचे असताना शिर्डी येथून
६५ हजार रुपयांना खरेदी केले होते. वाऱ्याच्या वेगाने धावणारा चिम्या अनेक बैलगाडा शर्यतींमध्ये गाडे कुटुंबीयांचे तसेच साकोरे गावाचे नाव उज्ज्वल करत होता. ‘चिम्याची बारी घाटात आली’ असे जाहीर होताच मैदानातील प्रेक्षक उभे राहून शिट्ट्या टाळ्यांच्या गजरात सलामी देत असत.
निमगावमधील बैलगाडा शर्यती दरम्यान पाय मोडल्याने चिम्या गंभीर जखमी झाला होता. शस्त्रक्रिया करूनही तो पायावर उभा राहू शकत नव्हता. अखेर त्याचा बुधवारी मृत्यू झाला.
03593

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com