कळंबमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा
महाळुंगे पडवळ, ता. २३ : कळंब (ता. आंबेगाव) येथील माळीमळा मंदिराचा जिर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम शनिवारी (ता. २१) ते रविवार (ता. २२) या काळात टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक वाद्याच्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
शनिवार सकाळी विधी, गणेश पूजन, मूर्तीला अभिषेक, कलश मिरवणूक, पूजा, महाआरती, व सायंकाळी कलश मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कलशधारी महिला, बाल वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळंब ग्रामपंचायत चौकात भक्ती शक्ती गुरुकुल संस्थापक गणेश महाराज घोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वारकरी पथकाने मिरवणुकीत सहभाग घेतला. ज्ञानोबा, तुकाराम यांचा गजर करत बाल वारकऱ्यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा रंगला. यावेळी महिला व पुरुषांनी फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, सरपंच उषा कानडे, उपसरपंच कमलेश वर्पे, शिवाजी भालेराव, ग्रामपंचायत सदस्या गुलाबबाई कानडे, भरत कानडे, सेवानिवृत्त प्राचार्य माधव कानडे, ज्ञानेश्वर कानडे, शिक्षक बाळासाहेब कानडे, विकास कानडे, संतोष कानडे आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना यज्ञाचार्य विवेक गुरू यांच्या हस्ते झाला. कलशारोहण व ध्वजारोहण गुलाब महाराज खालकर यांच्या हस्ते, सुरेखाताई शिंदे आणि आदिनाथ महाराज जुन्नरकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. त्यानंतर गणेश महाराज घोडेकर यांचे हरिकीर्तन पार पडले. कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश कानडे, अर्जुन कानडे, उद्योजक विष्णू कानडे, विजय कानडे, रोहन कानडे, राजेंद्र कानडे, अवधूत कानडे, शुभम कानडे यांच्यासह मुंजोबा महाराज व बुवासाहेब महाराज मित्र मंडळाच्या सभासदांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

