‘दत्तकृपा’, ‘मोढवे’ यांचा बैलगाडा प्रथम
महाळुंगे पडवळ, ता. २१ : साकोरे (ता. आंबेगाव) येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त झालेल्या फायनल बैलगाडा शर्यतीत दत्तकृपा बैलगाडा संघटना व बाजीराव मोढवे (साकोरे) यांचा बैलगाडा प्रथम आला. एकूण १२० बैलगाडा मालकांनी शर्यतीत सहभाग घेतला.
गुरुवारी (ता. १९) सकाळी निशाणाची घाटातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बैलगाडा शर्यतींना प्रारंभ झाला. पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, पराग पतसंस्थेचे संचालक पूजन शहा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश कानडे, भास्कर डोके, नगरसेवक बाजीराव मोरडे, बाळासाहेब पिंगळे यांनी भेट दिली.
सचिन मोढवे यांचा बैलगाडा प्रथम क्रमांकात फळीफोड ठरला आहे. द्वितीय क्रमांकात वैभव चासकर तर तृतीय क्रमांकात संतोष मोहरे यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत घेण्यात आली. त्यामध्ये २२ बैलगाड्यांनी सहभाग घेतला. प्रथम-दत्तकृपा बैलगाडा संघटना तसेच बाजीराव मोढवे (साकोरे), दुसरा-अंकित जाधव (नांदूर) व नारायण शेगर (चास), तिसरा-सचिन साऊंड सर्व्हिस, भागा भय्ये तसेच तुकाराम वायाळ, चौथा-नंदाराम भालेराव (कळंब) तसेच नीलेश कानसकर, पाचवा-अक्षय मोढवे व सीताराम थोरात तर सहावा-शर्विलराजे बारवे (चास) व शशिकांत भालेराव (कळंब) यांचे बैलगाडे विजेते ठरले. घाटाचा राजा हा किताब दत्तकृपा बैलगाडा संघटना (साकोरे) यांच्या बैलगाड्याने मिळविला.
माजी सरपंच अशोकराव मोढवे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विनोद मोढवे, गणेश गाडे, सचिन मोढवे, अनिल गाडे, दत्तात्रेय मोढवे, अर्जुन गाडे, जगन्नाथ गाडे, अंशीराम मोढवे, खंडू गाडे यांनी यात्रेचे संयोजन केले. बाबासाहेब मोढवे यांनी निशाणाची जबाबदारी पाहिली. समालोचन साहेबराव आढळराव पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

