साकोरे येथे रंगला कुस्त्यांचा आखाडा

साकोरे येथे रंगला कुस्त्यांचा आखाडा

Published on

महाळुंगे पडवळ, ता. २२ : साकोरे (ता. आंबेगाव) येथे भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात १०० हून अधिक पहिलवान सहभागी झाले होते.
येथे आखाड्यासाठी स्वतंत्र मैदान तयार केले होते. विविध भागांतून आलेल्या नामांकित व नवोदित मल्लांनी सहभाग घेत चुरशीच्या लढती सादर केल्या. पहिलवान वक्रतुंड फादले, ओंकार काटकर, ओम जाधव, हर्षल फरतडे, सचिन धाडवड आदी पहिलवानांनी उत्तम कुस्त्या केल्या. स्वरा गाडे, पूर्वा कोकणे या मुलींनी देखील कुस्तीचे मैदान गाजविले. कुस्ती स्पर्धेसाठी एकूण एक लाख ५० हजार रुपयांची बक्षीसे ठेवली होती. पहिलवान कुंडलिक गाडे, जयवंत गाडे, युवराज मोढवे, शरद गाडे, अमित मोढवे, किरण लोहट व सुभाष मोढवे आदींनी आखाड्यात पंच म्हणून काम पाहिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांच्या हस्ते विजेत्या पहिलवानांचा सत्कार करण्यात आला. आखाड्याचे संयोजन माजी सरपंच अशोकराव मोढवे, विजय मोढवे, गणेश गाडे व जग्गनाथ गाडे यांनी केले. अक्षय मुळूक यांनी समालोचन केले.

03647

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com