चांडोली बुद्रूक केंद्रातील १५ शिक्षकांना पुरस्कार

चांडोली बुद्रूक केंद्रातील 
१५ शिक्षकांना पुरस्कार
Published on: 

महाळुंगे पडवळ, ता. ४ : चांडोली बुद्रूक (ता. आंबेगाव) केंद्रातील १२७ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या यशाची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेने केंद्रातील पाच शाळांमधील १५ शिक्षकांना ‘जिल्हा शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात ‘कॉफी विथ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ’ या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा या वेळी सन्मान झाला. गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे व शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनामुळे केंद्राने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त शिक्षक : सीमा कहडणे (केंद्रप्रमुख), संगीता वाव्हळ, सोनाली पालेकर, दीपा गोरडे, अनिल लोंढे, मृणाल गांजाळे, शशिकांत थोरात, धनश्री चासकर, सुनील वाघ, रोहिणी लोंढे, अनिता पोखरकर, संदीप शिंदे, कमल थोरात, साधना सांडभोर आणि सुनीता चासकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.