नायगाव, माळशिरस, पिसर्वे येथे ध्वजवंदन उत्साहात

नायगाव, माळशिरस, पिसर्वे येथे ध्वजवंदन उत्साहात

Published on

माळशिरस, ता. १८ : नायगाव, माळशिरस, पिसर्वे, पोंढे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी काढून मुलांनी या वेळी घोषणा दिल्या. नायगाव ग्रामपंचायत येथील ध्वजवंदन सरपंच भारती चौंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथील ध्वजवंदन अक्षर सृष्टी संस्थेच्या संगीता पवार यांनी केले. सिद्धेश्वर विद्यालय येथील ध्वजवंदन अग्नीवरमध्ये भरती झालेले युवक संदेश मेमाणे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौंडकरवाडी येथे ध्वजवंदन सदाशिव चौंडकर यांनी केले. या दिवशी मुलांनी कवायत केली. मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजवंदन राजेंद्र यादव यांनी केले. माळशिरस ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन प्रशासक महादेव कांबळे यांनी केले. भुलेश्वर विद्यालय येथील ध्वजवंदन संस्थेचे अध्यक्ष बाळतात्या यादव यांनी केले. पोंढे येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीमध्ये ध्वजवंदन लष्करी सेवेत असलेले गावातील दत्तात्रेय वाघले यांच्या हस्ते झाले. पिसर्वे येथे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन सरपंच बाळासाहेब कोलते यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजवंदन पोलिस पाटील संभाजी कोलते यांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com