स्वच्छ, सुंदर शाळा बक्षीस वितरण सोहळा ११ जूनला

स्वच्छ, सुंदर शाळा बक्षीस वितरण सोहळा ११ जूनला

माळशिरस, ता. ५ : आमदार संजय जगताप आणि संत सोपान काका फाउंडेशनच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि संत सोपान काका बँकेचे संस्थापक शिक्षणप्रेमी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील पाच जिल्हे व ५७ तालुक्यात राबवलेल्या ‘संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा’ या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी (ता. ११) रोजी आचार्य अत्रे सभागृहात होणार असल्याची माहिती सासवड येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर उपस्थित होते. संत सोपान काका फाउंडेशनचे प्रकाश पवार, पुरंदर नागरी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप, विश्वजीत आनंदे, सतीश शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. तर अध्यक्षस्थानी आमदार संजय जगताप असतील. याप्रसंगी सागर म्हणाले, ‘‘स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा आदर्श शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही यावा आणि त्याला चालना मिळावी या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले आहे. या अंतर्गत २०२३ आणि २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजक आणि समन्वय समिती यांनी विभाग व जिल्हास्तरीय शाळांची तपासणी, छाननी करून स्वच्छ व सुंदर शाळांची निवड केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. या पाच जिल्ह्यातील ५७ तालुक्यातील ३००० माध्यमिक विद्यालयांची पाहणी करून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा आदी बाबींची पूर्तता केलेल्या शाळांना सन्मानित केले जाणार आहे.’’
कार्यक्रमात उपक्रमशील शाळा पुरस्काराने विभागस्तरावरून पाच शाळांचा विशेष सन्मान होणार आहे. जिल्हास्तरावर तीन क्रमांक काढण्यात येतील. यामध्ये प्रथम क्रमांक दहा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपयांचे बक्षीस असणार आहे. तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार, तृतीय क्रमांकास एक हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येतील. या कार्यक्रमप्रसंगी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील विजेत्या शाळांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक कुंडलिक मेमाणे आणि समितीचे सदस्य सुधाकर जगदाळे यांनी दिली.
कार्यक्रमासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती सागर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com