सोडून दिलेल्या वासरांचे अन्न पाण्यावाचून हाल

सोडून दिलेल्या वासरांचे अन्न पाण्यावाचून हाल
Published on

माळशिरस, ता. १० : दुपत्या जर्सी गाईंना झालेले खोंड घेण्यासाठी कुणीही तयार होत नाही. यामुळे आंबळे (ता. पुरंदर) परिसरातील दूध उत्पादक सध्या अनेक ठिकाणी दोन ते चार वर्षांची वासरे मोकाट रस्त्याच्या कडेने सोडताना दिसून येत आहेत. अशा वासरांचे अन्न पाण्यावाचून होल होत आहेत. ती मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची शिकार होत आहेत.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी लाभ क्षेत्रात फिरल्यानंतर या भागामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे घरोघरी आता दुपत्या गायांची गोठे दिसत आहेत. या गायांना होणाऱ्या कालवडी शेतकरी आवडीने सांभाळून दोन पैसे मिळत आहेत. मात्र, गाईला खोंड झाल्यास ते कोणीही सांभाळण्यात धजावत नाही. पूर्वीप्रमाणे आता अशा वासरांना खरेदीसाठी देखील कोणीही व्यापारी येत नसल्याने या वासरांचे करायचं काय? असा प्रश्न दुग्धोत्पादकांना पडतो. चारा खाण्या योग्य वासरू होण्याअगोदर त्याला सांभाळायचे झाल्यास दररोज दोन लिटरहून अधिक दूध पाजावे लागते व नंतरही त्याच्यापासून लाभ होत नाही. अशी वासरे दूध उत्पादकांकडून निर्जन ठिकाणी सोडून दिली जात आहेत. यामुळे प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

02346

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com