आंबळे परिसरात सव्वाशे मिलिमीटर पाऊस

आंबळे परिसरात सव्वाशे मिलिमीटर पाऊस
Published on

माळशिरस, ता.२४: मागील चार दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात होत असलेल्या पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. या भागातील आंबळे येथे घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार चार दिवसात १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आंबळे परिसरात प्रथमच मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानंतर या परिसरामध्ये सुरुवातीला वळवाचा जोरदार पाऊस बरसल्यानंतर कालपासून या परिसरामध्ये संततधार पाऊस होत आहे. आंबळे येथे घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार बुधवार तारीख २१ रोजी १० मिलिमीटर, गुरुवार तारीख २२ रोजी ५५ मिलिमीटर,शुक्रवार तारीख २३ रोजी २२ व आज ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मॉन्सूनपूर्व झालेल्या या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाची सुरुवात चांगली होणार असल्याने बळिराजा सुखावला आहे.
खरिपातील पेरण्या आता पावसाची उघडीप झाल्यानंतर वेळेवर होऊन हंगाम चांगला होईल, अशी शाश्वती आता शेतकऱ्याला वाटू लागली आहे. चार दिवसातील पावसामुळे विहिरींना देखील चांगले पाणी येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याप्रमाणे दिसत होते.
दरम्यान, दिवसभर होत असलेल्या आज संततधार पावसामुळे मेंढपाळ व्यवसायिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल झालेले पाहावयास मिळाले. अनेक ठिकाणी मेंढपाळ बकरी पावसात चरावयास बाहेर काढायचे कसे या चिंतेत दिसले. यामुळे पावसापासून रक्षणासाठी निवाऱ्याच्या ठिकाणी आसरा घेऊन बसलेले देखील पाहावयास मिळाले.


बाहेरगावी चाऱ्याच्या शोधात पडलेल्या मेंढपाळांना या पावसाचा मोठा फटका बसला. वाटेत उभ्या पावसामध्ये बकरी घेऊन जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मेंढपाळ भाऊसाहेब वाघमोडे यांनी सांगितले. मात्र, तीव्र पाणी टंचाईनंतर आता मुबलक स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने पुढील काळात साऱ्याचा प्रश्न नक्की मिटेल.
- भाऊसाहेब वाघमोडे, मेंढपाळ
02408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com