सासवड सुपा रस्ता वाहतूक बंद

सासवड सुपा रस्ता वाहतूक बंद

Published on

माळशिरस, ता.२७: पिसर्वे परिसरात मुसळधार पावसाने गावाजवळील महादेव मंदिराशेजारील ओढ्याला पूर आला आहे. येथील पुलामध्ये पाणी बसत नसल्याने ते रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे सासवड सुपा रस्त्यावरील या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पिसर्वे गावासह गावाच्या वरील बाजूस असणाऱ्या वाघापूर, राजेवाडी, आंबळे, सणसमळा या परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यातच मागील पंधरा दिवसात या ओढ्यावर असणारा सणस मळ्यातील मोठा पाझर तलावात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पाच दिवसातील या पावसाने पूर्व भागातील सर्वात मोठा असणारा हा तलाव भरून तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्यावाटे महादेव मंदिरानजीक असणाऱ्या सुपा सासवड रस्त्याकडे येत आहे. या ठिकाणी रस्त्यावर नव्याने काम करताना बांधलेला पूल एकच पाइप टाकून अत्यंत लहान स्वरूपाचा बांधण्यात आल्याने यामध्ये हे पाणी बसत नसल्याने ते रस्त्याच्या वरून पुढील बाजूने वाहत आहे. यामुळे हा रस्ता येथे वाहतुकीस धोकादायक झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे पिसर्वे स्कूल कमिटीचे अध्यक्ष अरुण कोलते यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पिसर्वे गाव ते वायकर वस्ती या दरम्यान रस्त्याचे चालू असलेल्या कामांमध्ये मुरमा ऐवजी मोठ्या प्रमाणावरती माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने वाहतूक करणे अवघड झाले. वाहने चिखलात रुतून बसत आहेत. दुचाकी चालकांना तर येथून वाहन चालवणे शक्यच नसल्याने या धोकादायकच रस्त्याऐवजी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे अरुण कोलते, माजी सरपंच बाळासाहेब कोलते, गौरव कोलते यांनी सांगितले.

02425

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com