भुलेश्वर घाटात सौर दिवे बसविण्याची मागणी
माळशिरस, ता. ३ : श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराकडे येण्यासाठी यवत- सासवड रस्त्यावरील घाटामध्ये सौर दिवे बसविण्याची मागणी माळशिरस (ता. पुरंदर) येथील शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे.
सासवड, यवत या राज्य महामार्गातील भुलेश्वर घाट रस्ता हा दौंड आणि पुरंदर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा आहे. या रस्त्याने दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये- जा चालू असते. पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावातील तरुण दौंड तालुक्यातील भांडगाव, यवत, सहजपूर या परिसरात कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी घाटामधून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे असुरक्षित आणि धोक्याचे आहे. अंधाराचा फायदा घेत गाड्या अडवून चोऱ्या होणे, अनुचित प्रकार घडत असतात.
पुरंदर तालुक्यात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. या देवस्थानच्या ठिकाणी याच मार्गे जाण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. तसेच श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर या ठिकाणी मोठी यात्रा भरते. त्या दृष्टीने घाट रस्त्यामध्ये रस्त्यावर अडथळा ठरत असलेली झुडपे, झाडांच्या फांद्या काढण्याची व सौर दिवे बसविण्याची मागणी शिवसेना माळशिरस शाखेचे पदाधिकारी यांनी आमदार शिवतारे यांच्याकडे केली आहे.
यावेळी युवासेना पुरंदर तालुका समन्वयक गणेश मुळीक, शिवउद्योगसेना पुरंदर तालुका कार्याध्यक्ष संतोष यादव, माजी उपसरपंच राजेंद्र गद्रे, ग्रामपंचायत सदस्य शरद यादव, निखिल यादव, गणेशराजे यादव, सागर यादव, गणेश यादव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.