पावसामुळे सीताफळ उत्पादनात होणार घट पावसामुळे सीताफळ उत्पादनात होणार घट
माळशिरस, ता. १५ : पुरंदर तालुक्यामध्ये मागील दोन महिन्यापासून झालेल्या जोरदार पावसामुळे सीताफळ फळाच्या हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. ज्यादा पावसामुळे सीताफळांच्या झाडांना फळे कमी व फुटवाच जास्त होत आहे. या प्रकारामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादक धास्तावले आहेत.
सततच्या ढगाळ हवामानाने ऊन कमी असल्याने सीताफळावर बुरी रोगाचा व काळा डाग पडण्याचा प्रकार वाढला आहे. यामुळे उन्हाळी हंगामा बरोबरच पावसाळी हंगामावरच्या बहारावतीही निश्चित झाला आहे. उत्पादक उन्हाळी हंगामात मार्च महिन्यामध्ये सीताफळाला छाटणी करून पाणी सोडतात. यामागेउत्पादकांचा प्रयत्न असतो की पावसाळी हंगामात जादा माल बाजारात येण्या अगोदर सुरुवातीच्या काळात कमी असणाऱ्या माला पासूनच जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न असतो.यंदा त्याच पद्धतीने उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी सीताफळांना मार्च महिन्यामध्ये पाणी सोडल्यानंतर झाडांनी चांगल्या प्रकारे फुलधारणा करून फळे येण्यास सुरुवात झाली.त्या नंतर मे महिन्याच्या पंधरावडया नंतरच जोराच्या पावसाला सुरुवात झाल्याने उन्हाळी हंगामातील सीताफळांची मोठ्या प्रमाणावरती फूलगळ तर झालीच त्याचबरोबर त्या हंगामातील फळधारणा झालेल्या सीताफळाला मोठ्या प्रमाणावर काळा डाग पडणे व भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला.तसेच त्यानंतर सतत पाऊस लागून राहिल्याने व ढगाळ हवामान असल्याने सीताफळाच्या साईज वाढण्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे.यामुळे लहान आकारमान असताना सीताफळ पक्व होऊ लागले आहेत.
श्रावण महिन्यात बाजारभाव कडाडणार
आषाढ महिन्यातील हे पंधरा दिवस झाल्यानंतर श्रावण महिन्यात उपवासानिमित्त फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सद्यःस्थितीत बाजारात होत असलेल्या सीताफळाची आवक पाहता पुढील महिन्यात सीताफळाचे बाजारभाव चांगले वाढतील अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा ज्यादा पाऊस असल्याने निम्म्याहून जास्त फळधारणे वरतीचा सीताफळाच्या परिणाम झाला असून बुरशीजन्य आजाराचा व काळे डाग पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने फळे अधिक खराबी होत आहेत.बाजारात अशा फळांना यामुळेच कमी भाव मिळतो.
- शंकर काळे, सीताफळ उत्पादक, पोंढे
सध्या पाऊस कमी झाला असल्याने व ऊन वाढण्याची चिन्ह जाणवत असल्याने पुढील सीताफळाचे साईज बनण्यावर याचा परिणाम दिसून येईल.बाजारात मात्र सीताफळांना भविष्यात चांगली मागणी राहील.
- रामचंद्र खेडेकर, उपाध्यक्ष, सीताफळ अंजीर उत्पादकसंघ महाराष्ट्र राज्य
02489
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.