महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला अधिकाऱ्यांची दांडी
माळशिरस, ता. २६ : एकल महिलांना मदतीचा हात देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. यामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व योजनांचा तालुक्याच्या ठिकाणी न येता गावपातळीवर लाभाच्या योजनांची माहिती देऊन त्याची जागेवरच निवड करून पात्र महिलांना लाभ देता यावा यासाठी शिबिर घेण्यात येत आहे.
माळशिरस येथे मंगळवारी (ता. २५) एकल महिला सक्षमीकरण शिबिर घेण्यात आले. त्याला पंचक्रोशीतील बारा गावातील २०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. मात्र विविध खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिराला दांडी मारली. यामुळे अपेक्षेने आलेल्या महिलांच्या पदरी निराशाच पडली.
शासनाची एकल महिलांसाठी असणारी संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लेक लाडकी, प्रधानमंत्री मातृवंदन योजना अशा विविध प्रकारच्या शासनाच्या तेरा योजनांची गाव पातळीवर माहिती देऊन त्यामध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निकषानुसार निवड करण्यासाठी माळशिरस येथे शिबिर घेण्यात आले.
पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेच्या या शिबिराचा फतवा ग्रामपंचायत, ग्रामसेवक कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामार्फत गाव पातळीवरती पोचवून अधिकाधिक महिला या शिबिरासाठी कशा येतील यासाठी या कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. माळशिरस येथील शिबिरात बारा गावांमधून महिला उपस्थित होत्या. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी कार्यक्रमाची वेळ असल्याने कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेवर महिला उपस्थित झाल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र आरोग्य विभाग वगळता सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर येण्याची तसदी घेतली नाही. तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे वेळेवरती उपस्थित राहून त्यांनी वैद्यकीय टीमसह महिलांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. त्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शिबिराला वेळ देण्याची तसदी घेतली नाही. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष नेवसे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली.
शिबिरात विविध योजनांच्या लाभासाठी महिला आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विविध योजनांचे सक्षम अधिकारी वर्ग नसल्याने शासनाच्या या शिबिरातून काही फलित झालं नाही.
-आरती यादव, सरपंच, माळशिरस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

