कंपन्यांच्या धोरणाचा शेतकरी, विक्रेत्यांना फटका
माळशिरस, ता.२०: यंदाच्या मुबलक पावसामुळे रब्बी हंगामातील पिके जोमदार आहेत. त्यामुळे युरियाची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे. याचाच गैरफायदा युरिया निर्मात्या खासगी कंपन्यांसह शासकीय नियंत्रणातील कंपनीही मोठ्या प्रमाणावर घेताना दिसत आहेत. युरियासह इतर लिंकिंग खते मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना कंपन्यांकडून दिली जात असल्याने खत विक्रेते घाईकुतीला आले आहेत. कंपन्यांच्या धोरणाचा पुरंदरसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकरी, विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा ताण वाढला आहे.
लिंकिंग खतांचा ताण विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या लिंकिंग खतांच्याा व त्यास येणाऱ्या विविध औषधांच्या किमती बाजारातील किमतीपेक्षा अधिक दराचे असल्याने हे खपवायचे कसे? असा प्रश्नही विक्रेत्यांना पडत आहे. नाइलाज म्हणून विक्रेत्यांकडून अशी खते व औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहेत.
बाजारामध्ये युरिया पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये शासनाच्या नियंत्रित असणाऱ्या आरसीएफ, क्रबको, इफको या कंपन्या युरियाचा पुरवठा खत विक्रेत्यांना करत आहेत. या कंपन्या जाहीररीत्या याचा कुठेही बोलबोला करत करत नसले तरी विक्रेत्यांना युरिया बरोबर नॅनो एरिया, नॅनो डीएपी, बायोला, सुजला, मायक्रोला ही अतिरिक्त खते घ्यावयास लावत आहेत. इतर खासगी कंपन्यांमध्ये युरिया पुरवठा करणाऱ्या झुआरी ॲग्रो, चंबळ फर्टीलायझर्स, महाधण या कंपन्यांकडून पुरवठा होत आहे. या कंपन्या युरिया बरोबरच इतर खते औषधे देखील विक्रेत्यांना घ्यावयास लावत आहेत. यामध्ये पाण्यापुढे फेकावयाच्या खतांबरोबरच वॉटर सोलिबल खते देखील दिली जात आहेत.
युरियाच्या तिप्पट इतर खते
पुरंदर तालुक्यातील एका खाते विक्रेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सहा टन युरियाचे एक वाहन आले आहे. याबरोबर ५ टन १४ ३५ १४ व ९ टन १० २६ २६ असे अतिरिक्त १४ टन इतर खत घ्यावी लागली आहे. यामुळे या इतर खतांच्या मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतून पडत आहे
नियमित दरापेक्षा जास्त दराची औषधे
पुरंदर तालुक्यातील एका औषध विक्रेत्यांनी सांगितले की, युरियाबरोबर दिली जाणारी तणनाशके व कीटकनाशके यांच्या किमती भरमसाठ आहेत. नियमित कीटकनाशके व तणनाशकाची जी आम्ही विक्री करतो त्यांच्या दरापेक्षा या औषधांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे ती विकायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यावर युरियासह अतिरिक्त लादल्या जाणाऱ्या खत औषधाबाबत कोणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्याबाबतची तक्रार कृषी विभागणी करावी त्याची योग्य ती दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
- श्रीधर जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

