आधुनिक संशोधनामुळे वाढली पपईची गोडी

आधुनिक संशोधनामुळे वाढली पपईची गोडी

Published on

माळशिरस, ता.२४ : परंपरागत शेतीला आधुनिक संशोधनाची जोड दिल्यास शेतीही भरघोस उत्पन्न देऊ शकते. हे सिद्ध करून दाखवले आहे. आंबळे (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी जयेश दरेकर यांनी. त्यांनी केवळ सव्वा एकर क्षेत्रात पपई पिकाचे यशस्वी उत्पादन घेत आठ ते १० लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे.
दरेकर यांनी आतापर्यंत ९६० झाडांतून ३६ टनांचे उत्पादन मिळाले आहे. त्यास १४ ते २९ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. त्यातून आठ लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाले. अजून चार ते पाच टन माल निघेल, असा त्यांना अंदाज आहे.
पपई उत्पादनाचे यश केवळ नशिबावर नव्हे तर सततचे निरीक्षण, पपईवरील सखोल संशोधन, योग्य वाणांची निवड, शास्त्रीय खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि वेळेवर कीडरोग नियंत्रण या सर्व घटकांमुळे शक्य झाले आहे.

पूर्व मशागत- दरेकर यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत पपई लागवड करण्याचा निर्णय घेतल्यावर लागवडी पूर्व नियोजन करून मशागत पूर्व खत व्यवस्थापन केले. रानाची नांगरणी, रोटरणी करून बेड शेणखत भरून घेतले व त्यावर प्रथम ठिबक व मल्चिंग टाकले व व रोजी जळगाव येथून रोपे आणून पपईची लागवड केली.

यामुळे केली १५ नंबर वाणाची निवड
मध्यम फळ
गोडी भरपूर
व्हायरसचा प्रादुर्भाव इतर वाणापेक्षा कमी
चांगली टिकवण क्षमता

असे केले रोग नियंत्रण
पपई रोगावरील रोगाच्या नियंत्रणासाठी जयेश दरेकर यांनी साधारणतः सोळा वेळा फवारणी विविध प्रकारच्या केल्या आहेत. तसेच पिकाच्या भरघोस वाढी करता तेरा आळवणी आतापर्यंत केले आहेत. आवश्यकतेनुसार आत्तापर्यंत त्यांनी आलटून पालटून अरेना गोल्ड, सुप्पर कॉन्फिडोर, साफ, रिडोमिल गोल्ड, अँलियेट याचा जास्त वापर केला.


माझा श्वास माझी शेती
विशेष म्हणजे जयेश यांनी हे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ‘माझा श्वास माझी शेती’ या नावाने YouTube, Instagram आणि WhatsApp माध्यमांतून अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचे काम सुरू केले आहे. पपई शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, यश–अपयश, खर्च–उत्पन्नाचे गणित, तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनामुळे पपई शेतीकडे वळले असून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

शेती ही तोट्याची नसून, योग्य नियोजन आणि अभ्यास केला तर ती नक्कीच नफ्याची ठरू शकते. तरुण पिढीने शेतीकडे उद्योग म्हणून पाहावे आणि डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून शेतीत नवे प्रयोग करावेत, हा संदेश या यशोगाथेतून मिळतो.
- जयेश दरेकर, आंबळे

02763

Marathi News Esakal
www.esakal.com