गुरोळीतील जलसंधारणाच्या कामांची आयुक्त  रमेश यांच्याकडून पाहणी

गुरोळीतील जलसंधारणाच्या कामांची आयुक्त रमेश यांच्याकडून पाहणी

Published on

माळशिरस, ता.२३ : गुरोळी (ता. पुरंदर) येथे जलसंधारणाच्या कामांना जलसंधारण आयुक्त अंजली रमेश यांनी भेट दिली. गावातील पाण्याची भूजल पातळी वाढवणे व शेतीच्या पाण्याची व्यवस्था करणे याविषयी झालेल्या जलसंधारण कामांना भेटी देण्यात आल्या.
यावेळी धरणाच्या स्थितीचा आढावा घेतला व गावात झालेल्या सिमेंट बांधाच्या कामाची पाहणी केली. अंजिराच्या बागांना भेटी देऊन अंजीर खाऊन आस्वाद घेतल्याने तेथील शेतकऱ्यांची ही स्तुती केली. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर आयुक्त जलसंधारण नितीन दुसाने, मृद व जलसंधारण प्रादेशिक विभागचे गौरव रवींद्र बोरकर, उपसरपंच जीवन खेडेकर, माजी सरपंच रामचंद्र खेडेकर, हिरामण खेडेकर, माजी विस्तार अधिकारी अरुण महाडीक, गोरख खेडेकर, सुरेश खेडेकर, प्रमोद शिंदे, सनी खेडेकर, जालिंदर खेडेकर, तुषार खेडेकर, परसराम खेडेकर व आधी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जलसंधारणाच्या विभागाच्या या प्रयत्नामुळे पाणी व्यवस्थापनात सुधारणा होऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यामुळे भविष्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्‍वास ग्रामस्थांनी व्यक्त केला

02807

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com