‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना
सेवा करण्याची संधी द्यावी

‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी

Published on

माळशिरस, ता. ३ : ‘‘पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या विकासपुरुष स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेवर परत एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्याची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी,’’ असे आवाहन बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार गौरव कोलते यांनी केले.
दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश बेलसर- माळशिरस गटातील राजेवाडी परिसरात आल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यासह गौरव कोलते यांनी या अस्तींच्या कलशाचे पूजन करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, दिवे गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमित झेंडे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष गौरी कुंजीर, बाजीराव कुंजीर आदी उपस्थित होते.
यावेळी गौरव कोलते म्हणाले, ‘‘स्वर्गीय अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कामाचा माणूस म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. चालू असलेल्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता परत एकदा आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. अजितदादांचा विकासाचा वारसा घेऊन राष्ट्रवादीचे आम्ही सर्व उमेदवार सामान्य माणसांचे आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पाणी प्रश्नावर ती निश्चित काम करू.’’

पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर- माळशिरस गटासह तालुक्यातील इतर सर्व जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सर्व यंग ब्रिगेड उमेदवार व पंचायत समितीचे सर्व आठही उमेदवार विजयी होणार आहेत आणि हीच श्रद्धांजली स्वर्गीय अजितदादांना खऱ्या अर्थाने ठरेल.
- जालिंदर कामठे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com