दिव्यातील दोघांवर पाणी चोरीप्रकरणी गुन्हा

दिव्यातील दोघांवर पाणी चोरीप्रकरणी गुन्हा
Published on

माळशिरस, ता.१२ : पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अनधिकृत पाण्याची चोरी करणाऱ्या दिवे (ता. पुरंदर) येथील दोघांवर पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापनाच्या वतीने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.
पुरंदर उपसा सिंचन योजनेवर नव्याने उपविभागीय अभियंता म्हणून सासवड कार्यालयात कार्यरत झालेल्या भाग्यश्री चवणे यांनी लाभ क्षेत्रातील सर्व गावांमध्ये स्वतः जाऊन शेतकऱ्यांना पाण्याची मागणी करण्याबाबत सांगितले. त्यानुसार सध्या रब्बी हंगामात शेवटच्या टप्प्यात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, लाभ क्षेत्रात पाणी अनधिकृतपणे पाणी घेत असल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यत आली.
उपविभागीय अभियंता भाग्यश्री चवणे या स्वतः पाणी वितरणा .करता असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अचानक पाहणी करत आहेत.
न, दरम्यान जीवन सुनील भापकर व अशोक गणपत टिळेकर यांच्यावर पाणी चोरीप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या या धडक कारवाईमुळे नव्याने कार्यरत असलेल्या टिळेकर यांचे योजनेच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

ज्या ज्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सिंचन विभागाकडे रीतसर पाण्याची मागणी करावी. त्यांच्या मागणीनुसार सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्याचा विभागाचा निश्चित प्रयत्न असेल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपली योजना समजून सहकार्य करणे गरजेचे आहे.
- भाग्यश्री चवणे, उपविभागीय अभियंता पुरंदर उपसा सिंचन सासवड कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com