''माळशिरस परिसरातील विजेच्या समस्या सोडवा''

''माळशिरस परिसरातील विजेच्या समस्या सोडवा''

Published on

माळशिरस, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील माळशिरस गणातील गावांमध्ये विजेच्या समस्यांबाबत असणाऱ्या अडचणी सोडवून आवश्यक त्या ठिकाणी नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य माऊली यादव यांनी महावितरणच्या अधिकार्यांकडे केली आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांना बुधवारी (ता. ४) माऊली यादव यांनी भेटून माळशिरस, राजूरी, पिंपरी, मावडी सुपे, नायगाव, रिसे, पिसे, पोंढे, पांडेश्वर, नाझरे सुपे, नाझरे कडेपठार, रानमळा, कोथळे, धालेवाडी या गावांमध्ये वाढत्या वीज लोडमुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर १५ ठिकाणी १०० के व्ही के क्षमतेचे रोहित्र वाढविणे तसेच ७ ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे, नवीन फ्यूज बॉक्स बसविणे, लाइन झोळ काढणे याबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com