वाघापुरात ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

वाघापुरात ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

Published on

माळशिरस, ता. ८ : वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथे मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान पार पडले. यावेळी नागरिकांना प्रलंबित वारस नोंद, शाळेतील मुलांना शैक्षणिक दाखले, जन्म, मृत्यू तसेच कुणबी आदी शासकीय योजनांच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे
ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे म्हणाल्या की, भोगावठादार, प्रलंबित वारस नोंद, सातबारा वाचन पूर्ण करून तुकडेबंदी कायदा रद्द करणे, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण गावनिहाय यादी करून व्यवहार हे नियमित करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिबिराचे दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्‌घाटन आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, भूमिअभिलेख अधिकारी स्मिता गौड हस्ते उत्साहात संपन्न झाले.

तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले की, पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, सर्वांसाठी घरे, अंतर्गत पट्टे वाटप प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढण्याबाबत १९६५ फेरफार रद्द झालेली आहेत, ११५ पाणंद रस्ते खुले करण्यात आलेले आहेत ६३ घरकुलांची यादी, तर २२०० रेशन कार्ड वाटप करण्यात आलेली आहेत. शिबिरासाठी स्मिता गौड भूमी अभिलेख, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख उमेश गायकवाड, वाघापूरच्या सरपंच दीपाली कुंजीर, विक्रम काळे, रूपाली झेंडे, माणिक निंबाळकर, माऊली यादव, दुय्यम निबंधक रवींद्र फुलपगारे, अविनाश थोरात, अविनाश बडधे, गणेश मुळीक, मनोज कुंजीर, गौरी कुंजीर, विजय कुंजीर तसेच सर्व शासकीय प्रशासकीय विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

02871

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com