

माळशिरस, ता. २६ : सासवड- सुपा राज्यमार्गावरील पारगाव चौफुला ते राजुरी दरम्यान पुलाच्या उंचीतील फरकामुळे धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनांचे अपघात होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुरंदर आणि बारामती तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, पिसर्वे ते राजुरी दरम्यान असलेल्या पुलाची उंची आणि नवीन रस्ता यामध्ये मोठी तफावत राहिल्याने खड्डा तयार झाला आहे. वेगातील वाहनांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने चालकांचे संतुलन बिघडून लहान- मोठे अपघात घडत आहेत. या ठिकाणी अद्याप कोणतेही सूचना फलक किंवा दिशादर्शक लावलेले नाहीत. ज्यामुळे रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच वाढतो. संबंधित विभागाने हा गॅप तातडीने भरून काढावा आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
02938
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.