भोरमध्ये भात पेरण्याची लगबग सुरू

भोरमध्ये भात पेरण्याची लगबग सुरू

महुडे, ता. ९ ः भोर तालुक्यात‌ शनिवारी (ता.८) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला. त्यामुळे वापसा तयार झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे. भात‌ पेरणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

भोर तालुक्यातील पश्चिम भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे या भागात पारंपारिक पद्धतीने पावसाच्या तोंडावर, माॅन्सूनचा अंदाज घेऊन धुळवाफेत भात पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे हिर्डोशी खोऱ्यातील भात पेरण्या चार दिवसांपूर्वीच उरकल्या असून शनिवारी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून या भात शेतीवरच शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असतात. हिर्डोशी भागात पर्जन्यमान मोठ्या स्वरूपात असते. एकदा पाऊस सुरू झाला की थांबण्याचे नावच घेत नसतो. त्यामुळे या भागातील शेतकरी पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने तरव्याच्या जागेची भाजणी करूनच पावसाच्या तोंडावर धूळ वाफेतच पेरणी केली जाते. त्यामुळे त्या भागातील भात पेरण्या तालुक्यात सर्वात आधी उरकल्या जातात. मात्र, नीरा देवघर धरणाच्या पूर्व भागात पावसाचे आगमन झाल्यावर पेरण्यांना सुरुवात केली जाते. दोन दिवसांपूर्वीच्या कडक उन्हाच्या जागी आता ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शनिवारी पडलेल्या पावसामुळे प्रामुख्याने इंद्रायणीबरोबरच, पार्वती, वरंगाळ, राशी पूनम, रत्नागिरी २४ अशा विविध जातींची बियाणांची पेरणी केली जाते. या आठवड्यात भात पेरण्यांची लगबग सुरु राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com