रायरेश्‍वरावरुन पायी वारीचे प्रस्थान

रायरेश्‍वरावरुन पायी वारीचे प्रस्थान

Published on

महुडे, ता. १ : किल्ले रायरेश्‍वर (ता. भोर) येथून पंढरपूर या पायी वारीचे प्रस्थान सोमवारी (ता. १) सकाळी झाले. रायरेश्‍वर येथील मंदिरात पादुका आणि वीणा पूजन करून ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात या पायी वारीला सुरुवात करण्यात आली.
रायरेश्‍वर धर्मादाय संस्थेमार्फत दिवंगत संपतराव जेधे यांनी सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे यावर्षी ४६ वे वर्ष आहे. रविवारी (ता. ३०) वारकरी रायरेश्‍वरला मुक्कामी होते. याप्रसंगी महिला वारकऱ्यांचाही सहभाग होता. विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात, गडाची लोखंडी शिडी उतरून सोहळा विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
यावेळी हभप नामदेव महाराज किंद्रे, बापू महाराज कंक, रामदास जेधे, रोहिदास जेधे, बापू भिलारे, नितीन जेधे, कोंढाळकर महाराज, सुवर्णा जेधे, सविता आलगुडे उपस्थित होते. मंगळवारी भोर येथे वारी मुक्कामी असून बुधवारी (ता. ३) सकाळी भोरमधून वारीचे पंढरपूरकडे प्रयाण होईल. यावेळी भोरमधील वारकरीही वारीत सहभागी होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.