हिर्डोशी भागात भात लावणीस प्रारंभ

हिर्डोशी भागात भात लावणीस प्रारंभ

Published on

महुडे, ता.३ : भोर तालुक्यातील हिरडस मावळात गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसाने भात खाचरात पाणी झाले आहे. त्यामुळे धुळ वाफेत पेरलेली रोपे लावणी योग्य झाल्याने हिर्डोशी भागात भात लावणीला सुरुवात केली आहे.
भोरच्या पश्चिम भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळ वाफेत भात पेरणी केली होती. त्यानंतर पडलेल्या वळीव पावसात तरव्यांची उगवण चांगली झाली असून, लावणी योग्य झाली आहेत. जून महिना संपला तरी म्हणावा असा पाऊस पडला नव्हता. परंतु गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने भात खाचरात पाणी साचू लागले आहे. त्यामुळे लागवडी योग्य झालेल्या रोपांची लागवड आता सुरू झाली आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर पुढील पंधरा दिवस या भागातील शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग राहणार आहे. या पुढील पंधरा दिवसात भात लावणीची लगबग राहणार असल्याने मजूर तुटवडाही भासणार असल्याने लागवडी योग्य आलेल्या रोपांची लागवड करण्यासाठी पाणी नसलेल्या भात खाचरात वाहळांचे पाणी घेऊन भात लावणीसाठी शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहे.
पश्चिम भागातील हिर्डोशी, कोंढरी, म्हसर तसेच मळे भुतोंडे खोऱ्यात भात लावणीला सुरुवात झाली आहे.

00853

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.