पिसावऱ्यात जन्मलेल्या विकृत वासराचा मृत्यू

पिसावऱ्यात जन्मलेल्या विकृत वासराचा मृत्यू

Published on

पिसावऱ्यात जन्मलेल्या बेढब वासराचा मृत्यू

महुडे, ता.५ : पिसावरे (ता.भोर) येथील शेतकरी शरद शेडगे यांच्या देशी गाईला शुक्रवारी (ता.४) सायंकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. नैसर्गिक प्रसूती होत नसल्याने अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ.शुभांगी गावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षकांनी तीन तास शर्थीचे प्रयत्न करून गायीची प्रसूती केली. या दरम्यान जन्मलेले वासरू बेढब होते. त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. गायीची परिस्थिती चिंताजनक असली तरी तिला वाचवण्यात संबंधित पथकाला यश आले आहे.

गायीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने शेडगे यांनी पशुधन पर्यवेक्षक मंगेश टिळेकर यांना बोलवले. तपासणी केल्यानंतर नेहमीप्रमाणे वासरू नसल्याचे त्यांना जाणवले. लागलीच त्यांनी वरिष्ठ अधिकारी गावकरे यांना सविस्तर माहिती कळवली. गावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळेकर यांच्यासह संजय कांबळे, संतोष निकम, संजय गजरे व प्रकाश खोपडे हे प्रसूतीसाठी उपस्थित राहिले. प्रयत्न करूनही प्रसूती होत नसल्याने डिस्टोकिंयामध्ये करायचे सर्व‌ तांत्रिक ज्ञान वापरून तीन तास शर्थीचे प्रयत्न करून नॉर्मल प्रसूती करण्यात संबंधीत पथकाला यश आले. वासरु बाहेर काढल्यानंतर ते बेढब (अनैसर्गिक) असल्याचे दिसून आले. प्रसूतीनंतर लगेच वासराचा मृत्यू झाला. परंतु या प्रसुतीदरम्यान गायीला अंसख्य वेदना, त्रास सहन करावा लागला असल्याने तिची अवस्था चिंताजनक बनली. परंतु तिच्यावर औषधोपचार करून तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे. गावकरे यांनी पुन:श्च शनिवारी (ता.५) पिसावरे येथे जाऊन गायीची पाहणी केली. गायीचे प्राण वाचवल्याने पशुसंवर्धन विभागाचे गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com