भोर तालुक्यात दरवळतोय इंद्रायणीचा सुगंध

भोर तालुक्यात दरवळतोय इंद्रायणीचा सुगंध

Published on

महुडे, ता. ८ : भोर तालुक्याच्या पश्चिम भागात भात पीक फुलोऱ्यात असून, लोंब्या लगडल्या आहेत. येत्या महिनाभरात भात पक्व होऊन पिके काढणी योग्य होणार आहेत. तालुक्यात सर्वाधिक पीक हे इंद्रायणीचे घेतले जाते. त्यामुळे सध्या सगळीकडे इंद्रायणीचा सुगंध दरवळत आहे.

भोर तालुक्यासह हिर्डोशी खोऱ्यात भात हेच प्रमुख पीक आहे. तालुक्यात ७ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर यंदा भात शेती केली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक पडल्याने पेरणी, लावणी वेळेत झाली असल्याने पीक जोमात आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेले ऊन व शेवटच्या आठवड्यात लागोपाठ चार पाच दिवस पडलेल्या पावसाने भात पिकांना ताप व पाणी मिळाल्याने चांगलाच फायदा झाला. त्यामुळे आता भात पिके फुलोऱ्यात आले असून भाताला‌ लोंब्या लगडल्या आहेत. अजून‌ काही ठिकाणी पिकं हिरवेगार दिसत असली तरी काही ठिकाणी पिवळसर‌ पडू लागली आहेत. कर्णफुले पिवळी पडल्यानंतर भात पीक काढणीसाठी तयार होणार आहे.

शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याची अपेक्षा
पश्चिम डोंगराळ भागात सध्या भात पिके चांगली असली तरी रानटी प्राण्यांचा त्रास सुरू आहे. याचबरोबर पुढील काळात पावसाचा लहरीपणा व करपा रोग यातून बचावलेल्या भात शेतीवर शेतकऱ्यांचे यंदाचे उत्पादन अवलंबून आहे. दरम्यान, यंदा हंगामामध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. तरी पण काढणी होऊन भात घरात नेईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलेला राहणार आहे.

01177

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com