बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळींचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळींचा मृत्यू
Published on: 

महुडे, ता.१७ : भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील आशिंपी (ता.भोर) येथील कुसुम राजू उंब्राटकर यांच्या रानात चरायला सोडलेल्या दोन पाळीव शेळ्यांचा सोमवारी (ता.१४) बिबट्याने फडशा पाडला. त्यातील एक शेळी मृत अवस्थेत सापडली.
उंब्राटकर यांनी सोमवारी (ता.१४) आशिंपी गावच्या हद्दीतील आंबेनळी परिसरात शेळ्या चरायला सोडल्या होत्या. शेळ्या चरून झाल्यावर घरी जाताना दोन शेळ्या‌ दिसेनात म्हणून पाहणी करत शोधले असता एक शेळी बिबट्याने मारुन टाकल्याने दिसली तर दुसरी शेळी मात्र सापडली नसल्याने ती बिबट्या जंगलात घेऊन गेला असल्याची शंका व्यक्त केली. याबाबत वनविभागाला कळवले असून वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा केला असल्याची माहिती रमेश उंब्राटकर यांनी दिली. सदर नुकसानीची भरपाई तातडने मिळावी अशी मागणी शेतकरी महिलेने केली आहे.
तर म्हसर बुद्रुक (ता.भोर) येथील बापू राघू गोरे यांच्या बुधवारी (ता.१६) चारायलेल्या सोडलेल्या शेळ्यांच्या कळपातील एका शेळीवर बिबट्याने झडप मारली. मात्र गोरे यांनी‌ आरडा ओरडा केल्याने बिबट्या शेळी सोडून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.