वारवंडमधील हॉटेलमधून चोरी

वारवंडमधील हॉटेलमधून चोरी

Published on

महुडे, ता. १० : भोर- महाड मार्गावरील वारवंड (ता. भोर) येथील ‘हॉटेल सेल्फी पॉईंट’मधील मालाची, तसेच वस्तूंची चोरी झाल्याची घटना सोमवारी (ता. १०) सकाळी सात वाजता उघडकीस आली.
उदरनिर्वाहासाठी वारवंड येथे प्रदीप दिघे (रा. वारवंड) व अजय पोळ (रा. शिरगाव) हे गेल्या काही वर्षांपासून रस्त्यालगत उभारलेल्या हॉटेल व्यवसायातून आपली उपजीविका करत आहेत. मात्र, या चोरीमुळे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. दिघे यांनी माहिती दिली की, रविवारी रात्री ८ वाजता हॉटेल बंद करून दोघेही घरी निघून गेलो. तरीही दिघे हे रात्री एक वाजता हॉटेलजवळून गेले असता त्यावेळी चोरी झाली नव्हती. त्यानंतर ही चोरी झाली. अजय याने सकाळी सात वाजता हॉटेल उघडल्यावर चोरी झाल्याचे समजले. पाहणी केल्यावर हॉटेलच्या मागील बाजूने खिडकी व पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. हॉटेलमधील सहा गॅसच्या टाक्या, कोल्ड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, बिस्कीट, वेफर्स, सिगारेट, फरसाण, साखर, चहापावडर, तेल याशिवाय बारीकसारीक वस्तू चोरट्याने चोरुन नेल्या. यात जवळपास ५० हजारांपर्यंत माल चोरीला गेला.
दरम्यान, कोंढरीतील २७ फेब्रुवारीला झालेल्या घरफोडीनंतर या हॉटेलमधील चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com