देवघर येथे पाणंद रस्ता वाहतुकीस खुला

देवघर येथे पाणंद रस्ता वाहतुकीस खुला

Published on

महुडे, ता.१२ : निगुडघर महसूल मंडलातील देवघर (ता.भोर) येथील अतिक्रमित झालेले दोन पाणंद रस्ते भोर प्रशासनाकडून खुले करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना व जनावरांना तसेच इतर शेती कामासाठीच्या वाहतुकीस आता हा रस्ता खुला झाला आहे.

देवघर येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून पूर्वीपासून असलेला वहिवाट रस्ता बंद केला होता. तसेच गावाच्या खालच्या बाजूकडील जुना पाणंद रस्ता अतिक्रमित झाला होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाणंद रस्ते व शीव रस्ते खुले करण्याच्या अभियानामुळे भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार आजिनाथ गाजरे, निगुडघरच्या मंडल अधिकारी रूपाली गायकवाड यांच्या उपस्थितीत देवघरमधील दोन्ही अतिक्रमित रस्त्यांपैकी एक गुरुवारी (ता.६) व दुसरा मंगळवारी (ता.११) ७५० मीटर खुले करण्यात आला.
यावेळी सरपंच मंगल कंक, ग्रामसेवक सुहास गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी विकास कारळे, रवींद्र बेंद्रे, शेखर शिनगारे, मंगेश चंदेले, पोलिस पाटील निवृत्ती साळेकर, उपसरपंच नामदेव कंक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
01632

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com