

हिर्डोशी, ता.२४ : आंबवडे व वीसगाव खोऱ्यासह तालुक्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग तसेच आंबा, फळबाग, फळभाज्यांचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव (ता.भोर) येथील शेतकरी अनिल काळूराम धोंडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर दीड एकरात काकडीची लागवड केली. यासाठी त्यांना साधारण ५० हजार रुपये खर्च आला असून आतापर्यंत तीन तोडे झाले असून १५ हजाराची विक्री झाली आहे. पुढे चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती. परंतु पावसामुळे काकडी वेलाला आलेली फुले झाडून गेली आहेत. पूर्ण लागवड क्षेत्रात पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीलगतच्या काकड्या खराब झाल्या आहेत. वेलासाठी रोवलेले बांबू व तारा आडव्या पडल्या आहेत. यामुळे काकडी पीक धोक्यात आले असून पुढील तोड्यातून मिळणारे उत्पादनात मोठी घट होणार असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
तालुक्यात उन्हाळी भुईमूगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पिकाची काढणी सुरू असताना जोरदार पावसामुळे पिकं भुईसपाट झाली आहेत. तर शेतात साठलेल्या पाण्यामुळे शेंगातील दाणे कुजणे, कोंब येणे यामुळे नुकसान होत आहे. तसेच शेतात पाणी साचल्याने भुईमूग काढण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. रावडी येथील विनायक दामले, श्यामकांत सासवडे, शिवाजी बांदल, मोहन बांदल आदी शेतकऱ्यांसह आंबवडे भागातील भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे.
फोटो - चिखलगाव (ता.भोर) काकडी पिकात साचलेले पाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.