बारे बुद्रुक येथील
घराची भिंत पडली

बारे बुद्रुक येथील घराची भिंत पडली

Published on

महुडे, ता. २७ : बारे बुद्रुक (ता. भोर) येथील संगीता शिवाजी दानवले यांच्या घराची एका बाजूची दगडी मातीची भिंत पडल्याची घटना रविवारी (ता. २५) घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रविवारी सकाळी भिंत घराच्या आतील बाजूस पडली. पावसाचे पाणी व भिंतीचे दगड, माती घरात पडल्याने कपडे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच, दुसऱ्या बाजूची भिंत डेवारली असून, कुटुंब नविन बांधलेल्या घरात रहायला असल्याने अनर्थ टळला असल्याचे सुदाम दानवले यांनी सांगितले. तसेच, झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली आहे. ग्रामविकास अधिकारी प्राची राजेशिर्के यांनी घटनास्थळी जाऊन मंगळवारी (ता. २७) पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com