बांबूमुळे उंचावणार शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान

बांबूमुळे उंचावणार शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान

Published on

विलास मादगुडे : सकाळ वृत्तसेवा
हिर्डोशी, ता.१६: भोर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ४० हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी लाभार्थी निवड करण्यात येत आहे. फळझाड लागवडीचा नैसर्गिक समतोल राखून बांबू लागवड करण्यात येत आहे. बांबू पिकातून रोजगार निर्मिती होणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. तसेच हेक्टरी अनुदान चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे भोरचे तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी केले आहे.

भोर तालुका हा डोंगराळ व दुर्गम भाग असलेला तालुका आहे. तालुक्यातील पश्चिम भागात मुख्य पीक असलेल्या भात शेती बरोबरच बांबू हे पीक सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. असून आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे हे पीक तालुक्यात आर्थिक दिशा आणि ऊर्जा देणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

यामुळे लागवड फायदेशीर
१. बांबूचे जीवन चक्र ४० ते १०० वर्षे असते
२. दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
३. डोंगर उतारावर करता येते लागवड.
४. लागवड केल्यानंतर चार पाच वर्षातच मिळते उत्पन्न.
५. बांबू जलदगतीने वाढणारे सदाहरित बहुउपयोगी वनोपज

उपजीविका करण्यासाठीची भटकंती थांबेल
भोर तालुक्याचा पश्चिम भाग असलेल्या हिरडस मावळ, म्हसर, वेळवंड, मळे, भुतोंडे या डोंगर खोऱ्यातील गावात बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. नीरा देवघर व भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन एखादा बांबू प्रकल्प, बांबूपासून वस्तू बनवण्याचा कारखाना, बांबूवर प्रक्रिया किंवा बांबू पासून बचत गट, महिला व युवकांना रोजगार कसा मिळेल. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बांबूमुळे रोजगाराची संधी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल व उपजीविकेसाठीही भटकंती थांबेल.

प्रकल्पाची आवश्यकता
* शेती
* हस्तकला
* बांधकाम
* फर्निचर, विविध वस्तू,
* कागद उद्योग, वाद्य निर्मिती

येथे मिळते अनुदान
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत बांबू लागवड अनुदान

लागवड प्रकार १
सलग...........१ हेक्टर
बांबू रोपे संख्या...........११११
अंदाजपत्रकीय अनुदान रक्कम...........७,०४,६४७ रुपये
रोपे लागवड अंतर...........३×३ मीटर
अनुदान देय...........४ वर्ष

लागवड प्रकार २
बांधावर...........१ हेक्टर
बांबू रोपे संख्या...........१३३
अंदाजपत्रकीय अनुदान रक्कम...........८४,२७३ रुपये
रोपे लागवड अंतर...........३×३ मीटर
अनुदान देय...........४ वर्ष

आवश्यक कागदपत्रे

७/१२ व सर्व ८ अ (३ महिन्याच्या आतील)
आधार कार्ड
राष्ट्रीयकृत बँक पासबुक
ग्राम पंचायत ठराव
जॉब कार्ड
सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र
जातीचा दाखला लागू असल्यास
जमिनीचे क्षेत्र २ हेक्टर (५ एकर) पेक्षा कमी

आमची १५ एकरमध्ये बांबू लागवड आहे. सध्या एक हजार बेटे असून, जवळपास १० ते १२ हजार बांबू आहेत. उंची व आकारानुसार १२०, ८० व ६० रुपये अशा किमतीनुसार प्रत्येक वर्षी सहा सात ट्रक बांबूची विक्री केली जाते. तसेच पॉली हाऊसच्या माध्यमातून घरच्या बांबूच्या पेऱ्यातून एक हजार रोपांची रोपवाटिका केली असून ७०० रोपांची ८० रुपये दराने विक्री केली आहे.
- ज्ञानोबा धामुनसे, शेतकरी हिर्डोशी

23061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com