आपटी रस्त्यावर कोसळले झाड

आपटी रस्त्यावर 
कोसळले झाड
Published on

हिर्डोशी, ता. १६ ः भोर- महाड रस्त्यावरील आपटी (ता .भोर) येथे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या मोरीच्या ठिकाणी सोमवारी (ता. १६) सकाळी झाड रस्त्यावर पडले. या पडलेल्या झाडामुळे रस्त्या शेजारील विजेच्या ताराही तुटल्या आहेत. तसेच मोरीच्या भागही खचला आहे. वाहनांसाठी रस्ता बंद झाल्याने या भागातील मुक्कामी असणाऱ्या एसटी बस भावेखल, अंगसुळे, करंजे मार्गे भोरकडे गेल्या. विजेचा प्रवाह तातडीने बंद केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. तर दोन तासानंतर मशिनच्या साहाय्याने झाड बाजूला करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली.
आपटी व भावेखल पूल दरम्यान ज्या ठिकाणी पडले तेथेच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोरी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम रस्त्याच्या अर्धवट भागात केलेले असून, काम अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. नेमके याच रहदारीच्या ठिकाणी विजेच्या तारा तोडून झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. तसेच रहदारीच्या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. भोर- महाड मार्गावरील जागोजागी खोदकाम केलेल्या ठिकाणी उपाययोजना करून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी करंजगावचे सुनील मोरे व प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com