किल्ले रायरेश्वरावर सुविधांचा अभावी पर्यटकांचा हिरमोड

किल्ले रायरेश्वरावर सुविधांचा अभावी पर्यटकांचा हिरमोड

Published on

विलास मादगुडे : सकाळ वृत्तसेवा
हिर्डोशी, ता. २९ : भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यात भोरपासून २८ किलोमीटरवर अंतर असलेल्या रायरेश्वर येथील मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये युवकांचे प्रमाण जास्त असले तरी सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. येथे आल्यावर सर्वांच प्रसन्न वाटते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा काहीसा हिरमोड होता.

रायरेश्‍वरावर मुंबई, पुणे येथून पर्यटनासाठी येणारे पर्यटक धांगडधिंगा किंवा हुल्लडबाजी दिसून येत नाही. येथे वास्तव्यास असणाऱ्या जंगम कुटुंबाकडून ऑर्डर प्रमाणे फक्त शाकाहारी जेवण बनवून दिले जाते.


दृष्टिक्षेपात
-किल्ले रायरेश्वरावर जाण्यासाठी १९९२ पासून लोखंडी शिडीचा वापर
-शिडी तीव्र उताराची असून दगडरूपी असलेल्या डोंगराला जोडलेली
-रविवार व सुट्टी दिवशी शेकडो पर्यटकांची गर्दी
-वाहतुकीची कोणतीही सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने पायथ्यापर्यंत प्रवास

या उपाययोजना आवश्‍यक
-पर्यटकांसाठी सूचना फलकांचा अभाव
-पायथ्याजवळ पार्किंगला जागा उपलब्ध, परंतु नियोजन नाही
-पठारावर स्वच्छतागृहाची दुरवस्था.
-पाण्याची टाकीच्या शेजारी ठिकाणी स्वच्छतेचा अभाव
-फक्त नियोजित कार्यक्रमात एक दोन पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती


किल्ल्यावर यांची आहे गरज
-सुसज्ज स्वच्छता गृह उभारणे
-पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर
-शिडीची प्रशासनाकडून वारंवार पाहणी करून डागडुजी करणे
-तुटलेल्या संरक्षण पाइपांची दुरुस्ती व धोकादायक ठिकाणी उपाययोजना
-दगडी पायऱ्या सुस्थितीत करणे
-पार्किंगसाठी नियोजन गरजेचे
-सुरवातीला चढणी ठिकाणी घसरगुंडी होत असल्याने उपाययोजना

पर्यटकांनी अशी घ्या काळजी
-पर्यटकांनी विशेष करून पाऊस काळात काळजीपूर्वक चढाई उतराई करावी
-शिडीवर गर्दी करू नये
-शिडीवरून फोटो व सेल्फी घेताना खबरदारी बाळगावी
-समोरून आलेल्या पर्यटकांना जाण्यासाठी जागा द्यावी

रायरेश्वर हे पर्यटन स्थळ प्रेक्षणीय असून मन प्रसन्न करणारे आहे. पाऊस काळात पर्यटक भिजतात. त्यामुळे महिलांसह पुरुषांसाठीही वेगळे चेंजिग रुम असणे गरजेचे आहे. येथे असलेल्या स्वच्छता गृहाची दुरवस्था झाल्याने वापरा योग्य नाही. तसेच शासनाकडून आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक उपचाराची व उपचाराची व्यवस्था करण्याची गरज आहे.
- ज्योती लकडे, पर्यटक वीटा (जि.सांगली)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरावर भेट देणे भाग्याचे आहे. येथे आल्यावर ऊर्जा मिळतेच याशिवाय येथील निसर्गाचा नजराणा, हवामान अनुभवायला मिळते. येथे लहान मुले व प्रोढांची वर्दळ असल्याने शिडीवरून चढताना व उतारतानाच्या सुरक्षिततेसाठी सुधारणा तर महिलांसाठी वॉशरुमची सुविधा करणे गरजेचे आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.


- अमित तांबे, पर्यटक बाणेर, पुणे


02084,02095

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com