चिखलगावातील आगीत सात लाखांचे नुकसान

चिखलगावातील आगीत सात लाखांचे नुकसान

Published on

हिर्डोशी, ता.२ : चिखलगाव धोंडेवाडी (ता.भोर) येथील हारूबाई राजाराम आंबवले (वय ६०) यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घर जळून सात लाखांचे नुकसान आहे. ही घटना बुधवारी (ता.२) सायंकाळी साडेसहा दरम्यान घडली. रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश आले असून प्रशासनाकडून गुरुवारी (ता.३) पंचनामा करण्यात आला.

आंबवले या विधवा महिला असून, त्या घरात एकट्याच राहतात. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर मुलगा बाहेरगावी वास्तव्यास आहे. शेतात मोलमजूरी करून त्या उपजीविका करीत आहेत. त्या बुधवारी भात लावणीसाठी शेतात गेल्या होत्या‌. त्यांच्या घरातून सायंकाळी धूर निघत असल्याचे दिसल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पावसातही आगीने रौद्ररूप धारण केले. घराच्या छपरावरील वासे, कौले यांसह घरातील धान्य, कपडे,भांडी व इतर जीवनावश्यक साहित्यांचे जळून नुकसान झाले.
दरम्यान, ग्रामस्थ व भोर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. प्रशासनाकडे तातडीने हारूबाई यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, मंडल अधिकारी एम. एस. शेख, ग्राममहसूल अधिकारी गजानन कदम यांनी केलेल्या पंचनाम्यात रोख रक्कम २८ हजार रुपये, एक तोळ्याची सोन्याची पोत, ५० किलो गहू, १०० किलो ज्वारी, २०० किलो तांदूळ, २५ गोधड्या, टीव्ही, पंखा, भांडी, गॅस टाकी, कपाट यासह जळणासाठीचे सरपण(फाटी) आणि घरासह इतर झालेले नुकसान मिळून अंदाजे सात लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पंचनाम्यावर सरपंच सुरेश धोंडे, सोपान धनावडे आदींच्या सह्या आहेत.

ध्रुव प्रतिष्ठानचे धनादेश
ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी धोंडेवाडीत जाऊन हारूबाई आंबवले यांना पाच हजार रुपयांचा धनादेश व संसारोपयोगी साहित्य दिले. रवी सोहम दत्त फाउंडेशन भोर, हिंदू एकता आंदोलन आणि सह्याद्री सर्च अँड रेस्कू फोर्स भोर यांचे वतीने सचिन देशमुख व शेखर घोणे यांनी आठवड्याभर पुरेल एवढा किराणा, तरकारी आणि बेकरी पदार्थ नेऊन दिले. तसेच ग्रामस्थांकडून त्यांना मदत केली जाणार असल्याचे ग्रामस्थ संकेत धनावडे यांनी सांगितले.


02121

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com