वरंधा घाटात बिबट्याचे दर्शन

वरंधा घाटात बिबट्याचे दर्शन

Published on

हिर्डोशी, ता.१६: वरंधा घाटातील दारमंडप ते उंबर्डे दरम्यान शनिवारी (ता.१६) रणजित देशमुख यांना शनिवारी (ता.१६) रस्त्याशेजारील झुडपात बिबट्याचे दर्शन झाले. देशमुख हे त्यांच्या आई अलका देशमुख यांच्यासोबत थार मोटारीतून महाडकडे निघाले होते.

देशमुख हे महाड तालुक्यातील कांबळे येथील रहिवासी असून त्यांचा जयतपाड (ता.भोर) येथे पोल्ट्री व्यवसाय आहे. त्यामुळे ते आठवड्यातून दोन तीन वेळा वरंधा घाटातील दारमंडपहून शिळींब साळूंगणमार्गे जयतपाडला जात असतात. शनिवारी सकाळी ते महाडकडे जात असताना भोर महाड मार्गावर रस्त्याशेजारी बिबट्या निदर्शनास आला म्हणून त्यांनी वाहन थांबवून हॉर्न वाजवला. त्यावेळी बिबट्या जवळून एक मोर उडून गेल्याचे त्यांना दिसले. बराच वेळा ओरडलेल्या आवाजाला व वाजवलेल्या हॉर्नला दाद न देता बिबट्या जवळपास १५-२० मिनिटे त्याच एका जागेवर आक्रमक स्वरूपात ठाण मांडून बसला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, दोन दुचाकीस्वारांनी बिबट्याला पाहिल्याने ते घाबरून निघून गेले. दरम्यान, देशमुख यांनी जाताना रस्त्यात भेटणाऱ्या सर्व वाहनचालकांना बिबट्यापासून सावध रहा, असे सांगत होते. वरंधा घाट परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार वन्यप्राणी निदर्शनास येतात त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक, प्रवाशांनी वन्यप्राण्यांपासून सावधगिरी बाळगून प्रवास करावा, असे आवाहन हिर्डोशी वनविभागाचे वनपाल रोहन इंगवले यांनी केले आहे.
02317

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com