बांबू लागवडीचे शेतकऱ्यांना सांगवी भिडे येथे मार्गदर्शन

बांबू लागवडीचे शेतकऱ्यांना सांगवी भिडे येथे मार्गदर्शन

Published on

हिर्डोशी, ता. २० : सांगवी भिडे (ता.भोर) येथे गुरुवारी (ता. १८) बांबू लागवड, शोभिवंत वस्तू निर्मिती व विक्री व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नॅचरल इंडिया, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ व प्रबोध-बांबू सेतू स्वयंरोजगार व उद्योजकता विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बांबू दिनानिमित्त एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
बांबूबाबत कृषी विभागाकडून सुरू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना, बांबूवर प्रक्रिया करून शोभिवंत वस्तू तयार करणे व तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठेत असलेली मागणी याबाबत तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे समन्वयक विजय सातपुते यांनी सुरू असलेल्या अटल बांबू योजना व राष्ट्रीय बांबू मिशन योजनेंतर्गत बांबू लागवडीच्या अनुदानाची माहिती दिली. उपकृषी अधिकारी पंडित भोये, नॅचरल इंडियाचे दत्तात्रेय घोलप यांनी बांबू लागवड व प्रक्रिया उद्योगातून केलेली प्रगती, बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना असलेली मागणी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे व बांबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


02518

Marathi News Esakal
www.esakal.com