आपटी येथील ७० विद्यार्थ्यांना परमार्थाची गोडी

आपटी येथील ७० विद्यार्थ्यांना परमार्थाची गोडी

Published on

हिर्डोशी, ता. ५ : वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यासाठी नियोजनबद्ध अध्यात्म शिकविल्यामुळेच आपटी येथील ७० विद्यार्थ्यांना परमार्थाची गोडी लागली असल्याचे उद्गार ज्ञानेश्वर महाराज कोठुळे यांनी काढले. आपटी (ता. भोर) येथील आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था व श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित किर्तन सेवेत ते बोलत होते. श्री क्षेत्र नारायणपूरचे सद्‍गुरू टेंभे स्वामी, व्यवस्थापक भरत क्षीरसागर, नामदेव महाराज किंद्रे, विठ्ठल महाराज धोंडे यांच्या आशिर्वादाने आयोजित सोहळ्यात जननीदेवी अभिषेक, भजन, हळदीकुंकू, हरिपाठ, किर्तन, पुरस्कार, भजनीमंडळ आणि सरपंच, पत्रकार यांचा सन्मान कार्यक्रम झाला. यावेळी मारुती बदक आणि गंगाराम तामकर यांना जीवनगौरव पुरस्कार, किसन महाराज पिलाणे यांना वारकरी भूषण पुरस्कार, धनाजी हिरगुडे यांना भजन सम्राट पुरस्कार, तुकाराम दानवले यांना मृदंग सेवा पुरस्कार, नंदिनी दातार व जयप्रकाश दातार यांना आदर्श माता-पिता पुरस्कार, सीमा तनपुरे यांना समाजसेविका पुरस्कार, सुरेश सुतार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. आनंदा कंक यांना आरोग्य सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कीर्तनकार राहुल महाराज पारठे यांनी प्रास्ताविक केले. तर आपटी विकास सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण पारठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com