हिर्डोशी भागात जिओची सेवा विस्कळित
हिर्डोशी, ता. २४ : भोर शहरासह हिर्डोशी भागातील जिओचे नेटवर्क गेल्या दोन दिवसांपासून विस्कळित होत आहे. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी (ता.२४) दुपारी दोन तास नेटवर्क बंद होते.
हिर्डोशी भागात जिओ नेटवर्क उपलब्ध असल्याने जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सेवा विस्कळित झाली की संपूर्ण भागात फोनद्वारे होणारा संपर्क तुटला जातो. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क बंद पडण्याच्या, सोशल मीडियावरची नेटवर्क गती मंदावलेच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. कंपनीची सेवा विस्कळित झाल्याने फोन न लागणे, फोन आल्यानंतर किंवा केल्यानंतर आवाज अस्पष्ट येणे, फोन अचानक कट होणे, इंटरनेटला रेंज असूनही सोशल मीडिया व्यवस्थित न चालणे, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करता न येणे अशा अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हिर्डोशी, कोंढरी वारवंड, कारुंगण आदी परिसरासह भोर शहर व आंबवडे खोर्यातील नेटवर्क विस्कळित झाल्याच्या घटना घडत आहेत.
नेटवर्कमुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त
हिर्डोशी खोऱ्यात जिओचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने इतर कंपनीचे सिम घेऊन त्याचा वापर होत नाही. त्यामुळे सर्रास नागरिकांकडे जियो सिम आहेत. परंतु विस्कळित होत असलेल्या नेटवर्कमुळे परिसरातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समस्येवर मार्ग काढून सेवा तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

