कोर्लेच्या विद्यार्थ्यांकडून शौर्यगाथांचे सादरीकरण

कोर्लेच्या विद्यार्थ्यांकडून शौर्यगाथांचे सादरीकरण

Published on

हिर्डोशी, ता. २३ : किल्ले रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले (ता. भोर) येथे गुरुवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त ग्रामस्थ व नवतरुण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात कोर्ले जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शौर्य पराक्रमांच्या शौर्यगाथा नृत्यातून सादर करताना विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकत इतिहासाच्या आठवणी जागवल्या.
किल्ले सिंहगडावरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत, शिवरायांचा जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन, हळदी-कुंकू, महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. ग्रामस्थ व तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, पेहराव घालून सादर केलेल्या कलागुणांना ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत कौतुक केले.
यावेळी सरपंच मंदाकिनी आडसूळ, तंटामुक्ती अध्यक्ष भागूजी चिकणे, शालेय समिती अध्यक्ष नवनाथ चिकणे, उपाध्यक्ष आशा वाडकर, बाजीराव चिकणे, अंकुश चिकणे, सुनील चिकणे, संदीप चिकणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कानडे, उपशिक्षका अनिता गायकवाड, छाया जगताप, पालक, मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुनीता कानडे यांनी, तर भागूजी चिकणे यांनी आभार मानले.

03117

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com