आपटीतील विद्यार्थ्यांचा जुलाबामुळे मृत्यू

आपटीतील विद्यार्थ्यांचा जुलाबामुळे मृत्यू

Published on

हिर्डोशी, ता. २१ : आपटी (ता. भोर) येथील आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील १३ वर्षीय विद्यार्थ्यांचा जुलाबाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १९) रोजी घडली. शुभम सखाराम गोगावले असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाचे वडील सखाराम गोविंद गोगावले (रा. कामथे ता. पोलादपूर, जि.रायगड. सध्या रा. वाई) यांनी भोर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोगावले यांची सोहम (वय १५) व शुभम ही दोन्ही मुले आपटी येथील वारकरी शिक्षण संस्थेत राहण्यास असून आपटी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. शुभम याला बुधवारी रात्री जुलाब झाल्याचे संस्थेकडून कळताच गुरुवारी सकाळी त्याचे आई-वडील आपटीत त्याला पाहण्यास आले. शुभमला भेटल्यावर त्याने जुलाब होत असल्याचे सांगितले. आई त्याला भात खाऊ घालत असताना त्याला चक्कर आली. त्याने डोळे फिरवले. उपचारासाठी भोरमधील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करण्यात आले असून भोर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com