भोरमध्ये परीक्षेला २२७५ विद्यार्थी

भोरमध्ये परीक्षेला २२७५ विद्यार्थी

Published on

हिर्डोशी, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृती परीक्षेसाठी भोर तालुक्यातून इयत्ता पाचवी व आठवी मिळून ऑनलाइन नोंदनी केलेल्या २ हजार ३१७ पैकी २ हजार २७५ विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. २२) परिक्षा दिली. ४२ विद्यार्थी गैरहजर राहिले.
गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या १५ केंद्रातील नोंदविलेल्या १ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ७२०पैकी ७०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पाचवीचे २८; तर आठवीचे १४ विद्यार्थी गैरहजर राहिले. जिल्हा परिषद शाळा आपटी, हर्णस,जांभळी, कामथडी, करंदी बुद्रुक, सारोळे, वेळू, श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे, राजा रघुनाथराव विद्यालय भोर, माध्यमिक विद्यालय पिसावरे, छत्रपती शिवाजी विद्यालय भोर, छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी, श्री शिवाजी विद्यालय नसरापूर, पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पांगारी या पंधरा केंद्रात पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. तर राजा रघुनाथराव विद्यालय भोर, गर्ल्स हायस्कूल भोर, श्री शिवाजी विद्यालय नसरापूर, विजय मुकुंदराव आठवले माळेगाव व माध्यमिक विद्यालय सारोळे या केंद्रात आठवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com