गेली पंधरा वर्ष रक्तदान करत वाढदिवस साजरा
हिर्डोशी, ता. २३ : भोर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व सद्गुरू सेवा ट्रस्टचे सचिव सागर सोंडकर हे गेली सलग पंधरा वर्ष रक्तदान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत. रविवारी (ता. २२) पुणे शहरातील जनकल्याण रक्तपेढी येथे पंधरावे रक्तदान करून त्यांनी ४० वा वाढदिवस साजरा केला. यातून ते रक्तदानाचा संदेश देत आहेत.
‘‘स्वतःच्या कृतीतून रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवण्यासाठी तसेच गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या हेतूने कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करता प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान केले जाते. आपली कृती पाहून कोणीतरी रक्तदान करेल व त्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाईल, या उद्देशाने रक्तदानाचा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे सोंडकर यांनी सांगितले. यावेळी विनोद बोडके, समीर घोडेकर, सुरज आवाळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

