शिक्षणाधिकाऱ्यांकडून 
भोरच्या शाळांची पाहणी

शिक्षणाधिकाऱ्यांकडून भोरच्या शाळांची पाहणी

Published on

हिर्डोशी, ता. २६ : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील निगुडघर, अंगसुळे व सांगवी भिडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी बुधवारी (ता. २५) भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी भोरचे गट शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे उपस्थित होते.
या भेटींदरम्यान शाळेची इमारत, वीज, संगणक, शौचालय, पाण्याची टाकी, किचन शेड, वॉल कंपाऊंड, मैदान इत्यादींची पाहणी करण्यात आली. शालेय पोषण आहारामधील विविध बाबींची चौकशी केली. अग्निशमन यंत्र रिफिलिंग केल्याबाबत पाहणी केली. विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व गणिती क्रिया, शैक्षणिक गुणवत्ता यांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटींवेळी विद्यार्थ्यांना लाडू व केळीचा खाऊवाटप करण्यात आला. या वेळी सोमनाथ कुंभार, माया बुदगुडे, तेजस्विनी गांगुर्डे आदी शिक्षक उपस्थित होते.
शाळा भेटीनंतर साडेपाच वाजता भोर पंचायत समिती सभागृहामध्ये गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व गट साधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आधार, अपार, यु-डायस प्लस, मॉडेल स्कूल, निपुण, सेवानिवृत्ती कर्मचारी, समग्र अनुदान, आरटीई, पाठ्यपुस्तक, शिष्यवृत्ती, नवभारत साक्षरता कार्यक्रम, एनजीओ तसेच विद्यार्थी गुणवत्ता यांबाबत मार्गदर्शन व चर्चा झाली. मनोजकुमार पुरंदरे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com