दिव्यांग विद्यार्थ्यांना 
भोरमध्ये साहित्य वाटप

दिव्यांग विद्यार्थ्यांना भोरमध्ये साहित्य वाटप

Published on

हिर्डोशी, ता. ८ : भोर पंचायत समिती (समावेशित शिक्षण), जिल्हा परिषद, फियाट ऑटोमोबाईल लिमिटेड शिरूर व अलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील १८ दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचे वाटप भोरमधील गट साधन केंद्रात करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या झालेल्या मोजमाप शिबिरातून आवश्यक प्राप्त साहित्यात मानसिक मंदता किट‌ (एमआर किट), गुडघा-घोटा-पायाच्या ऑर्थोसिस (कॅफो), घोट्याच्या पायाच्या ऑर्थोसिस (ॲफो), श्रवण यंत्र, अध्ययन पूरक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भोलावडे, शिंदेवाडी, गोरड म्हसवली, भाबवडी, आळंदे, कांजळे, भोंगवली, उत्रौली, शिवरे, देगाव या प्राथमिक शाळा तर हातवे माध्यमिक, राजा रघुनाथराव विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या प्रसंगी फियाट कंपनी व अमिल्कोचे प्रतिनिधी हर्ष विश्वकर्मा, दीपक यादव, रोहित कुमार, गट साधन केंद्राच्या गट समन्वयक प्रभावती कोठावळे, समावेशित शिक्षण विशेष तज्ञ अंजली आहिरे, विजय खुटवड, सुरेखा राजीवडे, मिथील बागडे, माया शिंदे व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com