शिरगावात महिला स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण

शिरगावात महिला स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण

Published on

हिर्डोशी, ता. ७ : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथे विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि आनंदी महिला ग्राम संघ शिरगाव यांच्या वतीने बुधवार (ता. ४), गुरुवारी (ता. ५) झालेल्या दोन दिवसीय महिला स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिरात सहभागी ५० हून अधिक महिलांनी गोमय आधारित उत्पादने, आयुर्वेदिक वनस्पती आधारित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
या शिबिरामध्ये गोमय आधारित उत्पादनांमध्ये गोमय दंतमंजन, धूप तर शिकेकाई आणि आयुर्वेदिक वनस्पतीवर आधारित उत्पादनांमध्ये साबण, शाम्पू तयार करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिषेक निगडे आणि निसर्गोपचार अनिकेत बापट यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देऊन पर्यावरणपूरक उद्योग उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. भोर पंचायत समिती व उमेद महिला सक्षमीकरण अभियानाचे सहकार्य लाभले. भोर तालुक्यातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निगडे यांनी सांगितले.
यावेळी बचतगट सीआरपी वैशाली दिघे, भारती उंब्राटकर, पूजा म्हसूरकर, अनिता मळेकर, आरती मळेकर, विठा सणस, अश्‍विनी पोळ, वनिता पोळ आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com