भोरमध्ये ३५ वर्षांनंतर हातपंप कार्यान्वित
हिर्डोशी, ता. २० : चिखलगाव (ता. भोर) येथील मोरेवस्तीत ३५ वर्षांपासून वापराविना बंद असलेला हातपंप पंचायत समितीच्या प्रयत्नांमुळे पुन्हा कार्यान्वित झाला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ही दुरुस्ती करण्यात आली असून, यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोरेवस्ती येथील हातपंपातील अडीच इंची १२ पाइप पूर्णपणे गंजले होते. हे पाईप बोअरवेलमध्ये पडण्याची भीती असतानाही, कर्मचाऱ्यांनी चार तासांच्या अथक परिश्रमानंतर ते बाहेर काढले. त्या जागी सव्वा इंची नवीन पाइप टाकून पंप सुरू करण्यात आला. तसेच म्हांकाळेश्वर मंदिराजवळील नादुरुस्त हातपंपही दुरुस्त करण्यात आला आहे. ही कामगिरी गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, उपअभियंता मनीष भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास सुर्वे, नितीन तुंगतकर, संजय चव्हाण, मनोज कांबळे, अविनाश कांबळे आणि नारायण सावंत यांनी केली.
तालुक्यात ६२४ हातपंप
भोर तालुक्यात एकूण ६२४ हातपंप असून, नादुरुस्त पंपांची दुरुस्ती मोहीम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

