वरंधा घाटात अपघाताचा धोका

वरंधा घाटात अपघाताचा धोका
Published on

हिर्डोशी, ता. १५ : भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली असून, संरक्षक कठडे रस्त्याशी समपातळीत आले आहेत. यामुळे खोल दरीच्या बाजूला अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून, तातडीने कठड्यांची उंची वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
प्रशासनाने सुरक्षिततेसाठी गुरुवारपर्यंत (ता. ३०) घाट वाहतुकीसाठी बंद ठेवला असला, तरी स्थानिक आणि कामावरील वाहनांची वर्दळ सुरूच असते. वाघजाई देवी मंदिर परिसरात एका बाजूला खोल दरी आहे. काँक्रीटीकरणामुळे जुने छोटे कठडे आता दिसेनासे झाले आहेत. काम पूर्ण झाल्यावर यावरून नियमित वाहतूक सुरू होईल, तेव्हा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिरगाव, शिळिंब, आशिंपी, उंबर्डे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कोकणात ये- जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी काँक्रीटीकरणापूर्वी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणे गरजेचे असल्याचे उंबर्डेचे माजी सरपंच प्रकाश पवार यांनी सांगितले.

03361

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com