नारायणगावात वेटरकडून
सोसायटी सचिवावर हल्ला

नारायणगावात वेटरकडून सोसायटी सचिवावर हल्ला

Published on

नारायणगाव, ता. 6 : येथील ‘गणपीर दरबार हॉटेल’मध्ये मित्रांसमवेत जेवणासाठी गेलेले नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव गणेश जयवंत गाडेकर (वय ४४) यांना व त्यांच्या मित्राला वेटरने हॉकी स्टिकने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सचिव गाडेकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी वेटर मल्हारी भाऊ फापाळे (रा. बदगी, बेलापूर, ता. अकोले, जि. नगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर, द्राक्ष व्यापारी रोहिदास पांडुरंग घोलप व व इतर मित्र हे मंगळवारी (ता. ४) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या ‘गणपीर दरबार हॉटेल’मध्ये गेले होते. रोटीची दिलेली ऑर्डर लवकर का आणत नाही, या कारणावरून वेटर मल्हारी फापाळे आणि गाडेकर व घोलप यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून वेटर फापाळे याने हॉकी स्टीकने गाडेकर व घोलप यांच्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात गाडेकर यांचे डोके, पाठ, पोट, छाती आदी ठिकाणी गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात घोलपसुद्धा किरकोळ जखमी झाले. गाडेकर यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.